Ad will apear here
Next
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा
मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल.

२००९ मधील शुभारंभानंतर कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रम भारतातील मुलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आला आहे. आजवर १०० शहरांमधील एक हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना यामुळे त्यांच्या मुलांना एक उज्ज्वल भविष्य देता आले आहे. मागच्या तीन वर्षात सुमारे १४.८ दशलक्ष मुलांनी या शिष्यवृत्ती कार्यक्रमात भाग घेतला आहे.

२०१७च्या आवृत्तीत सुमारे ०.९ लाख ग्राहकांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ‘बायजू’च्या अभ्यास-साहित्याचा लाभ झाला आहे. ‘बायजू’चे मोफत सभासदत्व ग्राहकांना चौथी ते बारावीपर्यंत गणित आणि विज्ञानाच्या शिकवणीचे व्हिडिओ देते. याचा वापर ‘बायजू’च्या अॅपवर एक खास कोड वापरून करता येतो. हा कोड कोलगेट शिष्यवृत्तीच्या पॅकच्या आतल्या बाजूला छापलेला असतो. ज्यांना ‘बायजू’चे अॅप उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी अभ्यासक्रमाच्या शिकवणीचे व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत, जे शिष्यवृत्तीच्या पॅकवर छापलेल्या एका टोल-फ्री नंबरवर उपलब्ध आहेत.  

‘कोलगेट’चे व्यवस्थापकीय संचालक इस्साम बचालानी म्हणाले, ‘प्रत्येकाला शिक्षणाद्वारे एक उज्ज्वल भविष्य मिळवण्याचा आणि आनंदी होण्याचा हक्क आहे, असा ‘कोलगेट’चा ठाम विश्वास आहे, आणि त्यालाच सत्यात आणण्यासाठी आमचा वार्षिक शिष्यवृत्ती कार्यक्रम असतो. हा कार्यक्रम दरवर्षी वाढतच आहे. यावर्षी आम्ही फक्त शिष्यवृत्त्याच वाढवलेल्या नाहीत, तर शिष्यवृत्त्यांच्या माध्यमातून ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप मोफत उपलब्ध करून देऊन आम्ही ‘बायजू’शी असलेले आमचे संबंधही जोपासले आहेत. जास्तीत-जास्त भारतीय कुटुंबांना, मुलांना या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करणे, आणि त्यांना एक उज्ज्वल भविष्य घडवण्यात मदत करणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.’

‘बायजू’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन म्हणाले, ‘कोलगेट पामोलिव्हशी असलेले आमचे संबंध जोपासण्यात आणि शिक्षण सगळ्या मुलांसाठी एका रंजक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आम्हाला खूप आनंद आहे. भारतातील जास्तीतजास्त कुटुंबांपर्यंत पोहोचण्याची आणि त्यांच्या मुलांसाठी खास तयार केलेले अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची आमची इच्छा आहे.’

या शिष्यवृत्तीत सहभागी होण्यासाठी ‘कोलगेट’च्या कुठल्याही पॅकची खरेदी करणे सक्तीचे नाही. एका मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणारी ही शिष्यवृत्ती ‘बायजू’चा खास कोड छापलेल्या कोलगेट डेंटल क्रीमच्या सर्व पॅकमध्ये (५० ग्रॅम आणि अधिक), कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट (१०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम ), कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट लेमन (१०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम), कोलगेट ऍक्टिव्ह सॉल्ट नीम (१०० ग्रॅम आणि २०० ग्रॅम), कोलगेट सिबाका (८० ग्रॅम आणि १७५ ग्रॅम) आणि कोलगेट सिबाका वेदशक्ती (८० ग्रॅम आणि १७५ ग्रॅम) यांमध्ये उपलब्ध आहे.  

कोलगेट शिष्यवृत्तीत सहभागी होण्यासाठी : १८०० ३१३ ४५७५
वेबसाइट : www.colgatecares.co.in
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZVSBR
Similar Posts
कोलगेट भारतातील प्रथम क्रमांकाचा ब्रँड मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड या ओरल केअर क्षेत्रातील अग्रेसर कंपनीला भारतातील सर्वांत विश्वसनीय ब्रँड्स २०१७ या सर्वेक्षणात प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला असून, हे सर्वेक्षण नेल्सनतर्फे आयोजित करण्यात आले होते. याचे परिचालन ब्रँड इक्विटीतर्फे करण्यात आले.
२५ टक्के भारतीय दातदुखी व संवेदनेने त्रस्त मुंबई : आरोग्य विम्याचा अंतिम निर्णय घेताना आपण त्यात डेंटल कव्हर आहे का हे पाहतो का? २५ टक्के भारतीय दातदुखी आणि संवेदनेने त्रस्त आहेत. इतकेच नाही तर, भारतातील पाच प्रौढांपैकी दोनजण वर्षातून एकदा तरी कोणत्या ना कोणत्या दातदुखीला सामोरे जातात. ही आयएमआरबीद्वारे कार्यान्वित आणि कोलगेटद्वारे घेतलेल्या
‘कोलगेट’चा ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’बरोबर सहकार्य करार मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड आणि ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’ यांनी सहकार्य करार करत ग्राहकांसाठी ‘पाणी बचाव’ कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतातील २७ ‘मेट्रो कॅश अॅंड कॅरी’ स्टोअर्स मध्ये केले आहे. महिनाभर चालणारा हा कार्यक्रम एक एप्रिल २०१९पासून सुरू झाला असून, यामध्ये संपूर्ण भारतातील पाणी वाचवण्याच्या
संदेश महाजनने जिंकली कोलगेट शिष्यवृत्ती मुंबई : ओरल केअर उत्पादनांच्या बाजारपेठेत अग्रस्थानी असलेल्या कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे दिली जाणारी कोलगेट शिष्यवृत्ती धुळे येथील संदेश महाजन या १२ वर्षांच्या मुलाने जिंकली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language